चवदार पुरण पोळी
Updated: Dec 15, 2022
- अपर्णा पाटील (श्रीवर्धन)
पुरण पोळी हे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध गोड पदार्थ आहे. हे सणावाराला बनवले जाते. मैद्याच्या चपातीमध्ये गॉड पुरण घालून बनविलेला हा पदार्थ आहे.
या लेखामध्ये आपण पूर्ण पोळी बनवायची कृती पाहणार आहोत.

साहित्य:
१. मैदा १ वाटी
२. १ वाटी चणा डाळ
३. १ वाटी गूळ
४. १ चमचा वेलची पावडर
५. १/२ चमचा जायफळ पावडर
६. चवीनुसार मीठ
७. साजूक तूप
कृती:
१. आधी मैदा चाळून घ्यावा.
२. चवीनुसार मीठ आणि १/४ वाटी तेल घालून मऊसर मळून घ्यावा. पोळीला पिवळा रंग हवे असल्यास, चिमूटभर हळद किंवा खायचा रंग घालू शकता. मळलेला पीठ झाकून ठेवावा.
३. चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यावी. त्यात ३ वाटी पाणी घालून कुकर मध्ये शिजत ठेवावे. पाच शिट्या झाल्यावर गॅस बंद करावा.
४. कुकर थंड झाल्यावर, सर्व मिश्रण बाहेर काढून त्यात गूळ, जायफळ आणि वेलची पावडर मिसळून घ्यावी.
५. मिश्रण पुरण यंत्रात, पाट्यावर किंवा मिक्सरवर वाटून घ्यावा. मिश्रण पातळ असल्यास कढई मध्ये गरम करून घट्ट करून घ्यावा.
६. मैद्याच्या पिठाची छोटी पारी करून त्यात पुरणाचा गोळा ठेवून बंद करून घ्या. मग हा गोळा कोरड्या मैद्यात घोळवून हलक्या हाताने चपाती सारखे लाटून घ्यावे. लाटताना पुरण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी.
७. लाटलेली पोळी तव्यावर खरपूस भाजून घ्यावी आणि वरून तूप सोडावे.
पुरण पोळी नारळाच्या रसा सोबत किंवा दूधासोबत खायला द्यावी.